Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारितेतील योगदानाबद्दल चंदन घोडके यांना भीमरत्न पुरस्कार

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच व संयुक्त जयंती महोत्सव संघमित्र तरुण मंडळ व राजापूर ग्रामस्थ (ता.श्रीगोंदा) यांच्यावतीने

महात्मा फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या
बोठे दाम्पत्याकडे बेनामी संपत्ती?…चौकशीची मागणी
जुगार अड्डयावर छापा साडे सात लाखाच्या मुद्देमालासह 24 ताब्यात

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच व संयुक्त जयंती महोत्सव संघमित्र तरुण मंडळ व राजापूर ग्रामस्थ (ता.श्रीगोंदा) यांच्यावतीने शनिवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा भीमरत्न, समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार चंदन घोडके यांच्या पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार चंदन घोडके यांनी वंचित घटकातील दिनदलित, मागासवर्गीय,आदिवासी व अशा अनेक वंचित समाजावरील होणारा अत्याचार अन्याय यांच्याविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमांतून आवाज उठवून त्यांना मानसन्मान व न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे याच कार्याची दखल घेऊन पत्रकार चंदन घोडके यांना भिमरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले.चंदन घोडके यांना भिमरत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचे पत्रकार संघटनेसह विविध क्षेत्रातील मान्यवर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामसथांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS