Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उजनी उपसा जलसिंचन योजना यावर्षीही सुरु राहणार ः बाबुराव थोरात

पदरमोडीची परंपरा आमदार आशुतोष काळेंच्या यंदाही सुरूच

कोपरगाव : रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकर्‍यांसाठी आधारवड असलेली रांज

आमदार काळेंच्या पुढाकारातून कोपरगावची बाजारपेठ फुलणार
संत किसनगिरी नगर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ
सुरेगावात विविध उपक्रमांनी मतदान जनजागृती

कोपरगाव : रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकर्‍यांसाठी आधारवड असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी 2004 ते 2014 या दहा वर्षात त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पदरमोड करून हि योजना चालविली. तीच परंपरा आ. आशुतोष काळे यांनी पुढे चालविली असून दुसर्‍या टप्यातील थकीत वीज बिल व वीज मोटारींची व पंपांची दुरुस्तीची कामे सुरु झाले असून हि उजनी चारी उपसा जलसिंचन योजना यावर्षीही सुरु राहणार आहे. अशी माहिती रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली आहे.
2004 पर्यंत बंद ठेवलेली कोपरगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जिरायती गावांना वरदान असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्यासाठी  माजी आमदार अशोकराव काळे यांनी 2005 साली विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत हि योजना पूर्ववत सुरु करून पश्‍चिम भागातील गावांना त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात मोठा दिलासा दिला होता. दुर्दैवाने 2014 नंतर या योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे हि योजना बंद पडून या भागातील शेती व शेतकर्‍यांचे भवितव्य धोक्यात आले असतांना आ.आशुतोष काळे यांनी आपल्या 2019 च्या विधानसभा जाहीरनाम्यात उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून हि योजना कार्यान्वित ठेवली आहे. त्यासाठी दरवर्षी येणारे वीज मोटारीचे वीज बिल व वीज मोटारीच्या पंपांच्या दुरुस्तीसाठी येणार्‍या खर्चासाठी करावी लागणारी पदरमोड आ. आशुतोष काळे स्वत: करीत आहेत.त्यामुळे 2019 ते 2024 पर्यंत हि योजना कार्यान्वित राहिली आहे. यावर्षी देखील हि योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या क्षमतेच्या वीज मोटारी व पंपांच्या दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली असून महावितरणचे सहाय्यक अभियंता अरविंद अग्रवाल,कनिष्ठ अभियंता रोशन टर्ले यांनी भेट देवून सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. पाईपलाईन लिकेज व इतर किरकोळ कामाबरोबरच दुसर्‍या टप्यातील थकीत विजेचे बिल देखील महावितरणला अदा करण्यात आले असल्याची माहिती या योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील  चितळी,धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असे. मात्र ज्यावेळी निळवंडे कालव्यांच्या चाचणीसाठी सोडण्यात आलेले पाणी या जिरायती गावात आणण्यासाठी कालव्यांची चाचणी सुरु असतांना आ.आशुतोष काळे यांनी स्वत: दुचाकीवरून पाहणी केली. दिवसभर त्या ठिकाणी बस्तान ठोकत स्वत:ची यंत्रणा वापरून कायमस्वरूपी बुजविण्यात आलेले ओढे, नाले उकरून जलद गतीने पाणी यावे यासाठी सिमेंट पाईप देखील उपलब्ध करून दिले.  स्वत: उभे राहून या पाण्यातून चर, ओढे नाले, पाणी पुरवठा साठवण तलाव व छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरून घेतले. परिणामी भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे यावर्षी कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघात कमी पर्जन्यमान झाले असतांना व मे महिना सुरु होवून देखील पाणी टंचाईचे संकट बहुतांश प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.
बाबुराव थोरात (अध्यक्ष-उजनी चारी उपसा जलसिंचन योजना)  

COMMENTS