नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, परिक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, आदी मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी केले. कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी कुलगुरूंना ध्वज फडकविण्यासाठी विनंती केली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुक्त विद्यापीठ आणि अद्यम योगा सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्युरेटीव योगा सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, आरोग्य विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदिप निकम, अद्यम योगा सेंटरचे संस्थापक डॉ. शंकर खेडकर उपस्थित होते.
या केंद्रामार्फत विविध असाध्य रोग जसे की, कंबर, मान, गुडघे दुखी यावर सांगण्यात आलेल्या शस्त्रक्रीया टाळल्या जातील. त्याचबरोबर जिवनशैलीशी निगडीत ऋदय विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यांच्यावर नाममात्र दराने उपचार केले जातील. विद्यापीठातील कर्मचारी, तसेच नाशिक परिसरातील नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले.
क्युरेटीव योग आणि त्याचा झालेला विकास आणि उत्कर्ष याविषयी डॉ. शंकर खेडकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्याचबरोबर क्युरेटीव योगा विषयीचा अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून तज्ञ योग प्रशिक्षक तयार केले जातील, ज्याचा समाजातील सर्व घटकांना उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी डॉ. संगिता पाटील, आरोग्य विज्ञान विद्याशाखा, मुक्त विद्यापीठ यांचेशी संपर्क साधावा.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, दैनंदिन वेतनावरी कर्मचारी, सफाई कर्मचारी, शेतमजूर, सुरक्षारक्षक, शेतमजूर यांचेसाठी विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेमार्फत चोलामंडलम जनरल इन्शुरन्स आणि पंजाब नॅशनल बॅंकेचे विद्यापीठ शाखा प्रमुक श्री विशाल वाघ पुरस्कृत संपूर्ण आरोग्य मोफत तपासणी त्यामध्ये डायबिटीस, रक्तदाब बिपी, जनरल हेल्थ चेकअप, ईसीजी वैदकीय सल्ल्याने, यामध्ये विविध गोष्टीवर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबीरास डॉ संदीप सांगळे, डॉ गौरी निकम, श्री अमोल वारे, श्री संजय पारोदे, डॉ दयाराम पवार यांचे सहकार्य लाभले. वरील संपुर्ण कार्यक्रमास विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS