श्रीरामपूर : सध्या देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत असून यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 220

श्रीरामपूर : सध्या देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत असून यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 220 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ‘स्वीप’ कक्षामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरातील तृतीयपंथी सेवा आश्रमात मतदार जनजागृती करण्यात येऊन तृतीयपंथी मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली.
श्रीरामपूर मतदारसंघात तीन लाख दोन हजार एकशे तेहतीस इतके मतदार असून त्यामध्ये साठ तृतीयपंथी मतदार आहे. मतदारनोंदनी मोहिमेत तृतीयपंथी मतदारांची मतदार यादीत १०० टक्के नोंदणी झाली असून येत्या १३ मे मतदान दिनी नोंदणी झालेल्या तृतीयपंथी मतदारांचे १०० टक्के मतदान करून घेण्यासाठी श्रीरामपूर मतदार नोंदणी कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे, निवडणूक शाखा समनव्यक संदिप पाळंदे, तुळशीराम शिंदे, पिंकी शेख यांसह अनेक तृतीयपंथी भगिनी उपस्थित होते.
COMMENTS