Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत आइसक्रीम विक्रेत्याची हत्या

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटजवळ आईस्क्रीम विक्रेत्याची  चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.

पुण्यात दगड डोक्यात घालून एकाचा खून
केरळमधून सोलापुरात स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा खून
धक्कादायक ! आईने मुकबधीर मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकले.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटजवळ आईस्क्रीम विक्रेत्याची  चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रभाकर (वय 25) असे हत्या करण्यात आलेल्या मृत आईस्क्रीम विक्रेत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहीती मिळताच पोलिसांचे पथक बुधवारी रात्री घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी त्यांना एक आईस्क्रीम विक्रेता पडून असल्याचे दिसले. त्याला दवाखान्यात नेण्यात आले मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.

COMMENTS