Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जात वैधता प्रमाणपत्राच्या मार्गदर्शनासाठी आज ऑनलाईन वेबनार

कोपरगाव तालुका ः विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संबंधी येणार्‍या अडी-अडचणी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी 19 एप्रिल रोजी ऑनलाईन वेबिनार

नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात
खा. लंके यांनी बनपिंप्री येथील टोल वसुली थांबविली
खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी

कोपरगाव तालुका ः विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संबंधी येणार्‍या अडी-अडचणी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी 19 एप्रिल रोजी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये समता पंधरवडा निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. समता पंधरवडा च्या अनुषंगाने 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थी यांना जात प्रमाणपत्र पडताळणी संबंधी येणार्‍या अडीअडचणी (उदा. कोणत्या प्रकारे अर्ज भरावा व कोणते दस्ताऐवज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे) याबाबतच तसेच बरेच अर्जदार अद्यापही जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रीयेबाबत अनभिज्ञ आहेत. याबाबत मार्गदर्शन तसेच त्यांचे शंकाचे निरसण करणेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर या कार्यालयामार्फत शुक्रवार, 19 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आलेला आहे. झुम अ‍ॅपवर (गेळप नेेा चशशींळपस श्रळपज्ञ -हीींिीं:/र्/ीी06ुशल.ूेेार्.ीी/क्ष/87954912952?िुव=र्7ींनलछधणघर्1ीेलथननीं7ुीलऋध84ङउक्षषलीं.1 , चशशींळपस खऊ: 879 5491 2952 , झरीीलेवश: 713092) या लिंकच्या माध्यमातून या वेबनार मध्ये सहभागी होता येणार आहे.

COMMENTS