Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षण न दिल्यास 5 जूनपासून पुन्हा उपोषण : मनोज जरांगे

मुंबई - लोकसभा निवडणुकीची देशभर रणधुमाळी सुरू असून, मराठा आरक्षणाचा लढा सध्या शांत असला तरी, रविवारी मनोज जरांगे यांनी 5 जूननंतर पुन्हा एकदा आमरण

सीमाप्रश्‍नांतील राजकारण
नव्या अध्यक्षांना अधिकार मिळतील का ?
व्यवस्थेला प्रश्न विचारणारी विवेकी पिढी घडली पाहिजे – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

मुंबई – लोकसभा निवडणुकीची देशभर रणधुमाळी सुरू असून, मराठा आरक्षणाचा लढा सध्या शांत असला तरी, रविवारी मनोज जरांगे यांनी 5 जूननंतर पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले असा आरोपही यावेळी जरांगे यांनी केला.
माध्यमांशी बोलतांना जरांगे म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत आमची कोणतीही भूमिका नाही. कुठे उमेदवार दिलेला नाही आणि कोणाला पाठिंबाही दिला नाही. यंदाची निवडणूक समाजाच्या हातात आहे. त्यामुळे कोणाला पाडायचे हे समाज ठरवणार. पाडण्यात सुद्धा मोठा विजय असल्याचे जरांगे म्हणाले. महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले, आज देऊ उद्या देऊ असे म्हणत आरक्षणाचे आश्‍वासन देऊन सात महिने झाले. महाविकास आघाडीमधील नेत्यांनीही चाळीस वर्षे आम्हाला फसवले असा आरोप जरांगे यांनी केला आहे. यावेळी फडणवीसांवर टीका करतांना जरांगे म्हणाले की, मी अजूनही गृहमंत्र्यांना सांगतो, तुम्ही माझ्या नादाला लागू नका. मी निष्ठावान आहे. मी माझी जात विकू शकत नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका. मला तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतले होते मात्र, मला राजकारणात हलक्यात घेऊ नका. मला तिकडे जायचे नाही. पण मला राजकारणात ओढायचा प्रयत्न केला, तर तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल. दलित, मराठा, मुस्लीम, लिंगायत, बारा बलुतेदार असे सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. यांनी दोन उपमुख्यमंत्री केले, आमचे सात होऊ द्यात. होऊ द्या सगळ्यांचे एकेक, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. तसेच मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेत असून, त्यांचे प्रेम इतके उफाळून येते की सांगता येत नाही असा टोलाही जरांगे यांनी लगावला. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणार्‍या पोलिस अधिकार्‍याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे, अशी टीकाही त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.

COMMENTS