कराड / प्रतिनिधी : कराड पालिकेने चार वेळा कोयनेसह कृष्णा नदीच्या काठांची स्वच्छता राबवली. नद्यांमध्ये कचरा टाकणार्यांना दंड केला. तरीही पुन्हा
कराड / प्रतिनिधी : कराड पालिकेने चार वेळा कोयनेसह कृष्णा नदीच्या काठांची स्वच्छता राबवली. नद्यांमध्ये कचरा टाकणार्यांना दंड केला. तरीही पुन्हा कोयनेसह कृष्णेच्या काठावर प्रदूषण वाढल्याने नद्यांचे पात्र त्या विळख्यात अडकू पाहात आहे. नदीकाठावर रात्रीत पडणारा कचरा आणि त्याच्या ढिगामुळे तो प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे.
नद्यांच्या स्वच्छतेकडे पालिका पुरेशा गांभीर्याने पाहात नाही. त्यात प्रदूषण करणार्यांवर जुजबी कारवाई होते. ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. माझी वसुंधरासहित स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल राहिलेल्या कराडच्या कोयना- कृष्णा नद्यांचे काठ अस्वच्छ होत आहेत. त्यावर ठोस उपायांची गरज आहे.
दोन्ही नद्यांच्या काठालगत मोकळ्या जागेत होणारे कचरा डंपिंगही होत आहे. ते रोखणे गरजेचे आहे. खासगी लोकांनी नदीकाठावर कचर्याचे डंपिंग केले आहे. नदीकाठापासून अवघ्या काही फुटांवर त्याचे डंपिंग वाढले आहे. तो कचरा नद्यांसहीत स्थानिकांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे नदीतही प्रदूषणाचा धोका वाढला आहे. नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पालिकेने हाती घेतला तरीही पालिकेला त्यात फारसे यश आले नाही. नद्यांच्या स्वच्छतेसाठी ठोस कारवाईसह नियंत्रणाची गरज आहे.
शहरात स्वच्छता राखण्याबरोबरच कोयना-कृष्णा नद्या कचर्याने प्रदूषित होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. माझी वसुंधरासह स्वच्छ सर्वेक्षणात कराड नगरपालिका नेहमीच अव्वल राहिली. देशातील सर्वांत स्वच्छ शहराचाही किताबही कराड पालिकेला मिळाला. ते मानांकन कायम राखण्यासाठी शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात.
त्यात सेल्फी पॉइंट, कारंजे, चौक सुधार योजना, भिंतीचे सुशोभीकरण, रंगरंगोटीसारख्या उपक्रमांत लोकसहभागातून स्वच्छता पालिकेने हाती घेण्या आले. नागरी वस्तीत काही ठिकाणी कचरा पडतो आहे. पालिका तोही कचरा उचलत आहे. ती स्थिती असताना नद्यांचे काठ अस्वच्छ आहेत. त्याच्या स्वच्छतेची दक्षता घेण्याची गरज आहे. कराड पालिकेच्या हद्दीत कोयनेसह कृष्णा नदीवर पूल आहे. याच पुलावरून कचरा टाकणार्यांविरोधात कारवाई पालिकेने जेमतेम दोन ते तीन दिवस. मात्र, पुन्हा त्या लोकांवर कारवाई झाली नाही. परिणामी त्यावरून नदीत टाकणार्यांचे प्रमाण पुन्हा वाढले गेले आहे. परिणामी नद्यांच्या पात्रात थेट कचरा पडतो आहे. पुलावरून कचरा टाकण्यापेक्षा नद्यांच्या काठावर थेट कचरा टाकणारेही वाढले आहे. निर्माल्य, प्लॅस्टिक, खाद्य पदार्थांसह अन्य कचर्यामुळेही दोन्ही नद्या प्रदूषित होत आहेत. नदीपात्रात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
कोयनेश्वर मंदिर, कृष्णा घाट, कमळेश्वर मंदिर, दैत्यनिवारणी मंदिर अशा अनेक रस्त्यावर कचर्याचे ढीग कायम दिसतात. नागरीवस्तीत त्या भागातील नागरिकांनी जबाबदारीने काम केले. अनेकदा वाद होत आहेत. त्या वेळी मात्र पालिका दोन पावले मागे सरकताना दिसते आहे. त्यात पालिकेची जबाबदारी काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कचरा टाकणार्यांवर पालिकेने ठोस उपाय करण्याची गरज आहे. त्यासोबत स्वच्छतेत समन्वय गरजेचा आहे.
COMMENTS