Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धन्वंतरी पतसंस्थेने मिळवला साडेसात लाखांचा नफा

माजी नगरसेविका मंगलाताई गाडेकर यांची माहिती

राहाता ः शहरातील महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या धन्वंतरी महिला नागरी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात दिलेल्या विविध ग्राहकाभिमुख से

मालधक्क्यावरील ठेकेदारांकडून जिल्हाधिकार्‍यांची दिशाभूल ; माथाडी कामगारांचा दावा, समक्ष पाहणीचे केले आवाहन
राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप
कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)

राहाता ः शहरातील महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या धन्वंतरी महिला नागरी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात दिलेल्या विविध ग्राहकाभिमुख सेवां तत्पर आणि पारदर्शक आणि विश्‍वासार्ह व्यवहारांच्या जोरावर 7 लाख 50 हजार रुपयांचा नफा मिळवला आहे असे प्रतिपादन धन्वंतरी महिला पतसंस्थेच्या चेअरपर्सन राहाता नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका डॉ. सौ. मंगलाताई गाडेकर यांनी केले.
     ठेवीदारांचा विश्‍वास संपादन करीत मागील वर्षी पेक्षा ठेवीमध्ये 30  टक्के ने वाढ होत 31 मार्च अखेर 7 कोटी 65 लाखांच्या ठेवी झाल्या आहेत. एकूण कर्ज 5 कोटी 65 लाख असून मागील वर्षीपेक्षा त्यात 25 टक्के कर्ज वाढले आहे. पतसंस्थेची सुरक्षित गुंतवणूक 2 कोटी 27 लाख इतकी असून वार्षिक भागभांडवल 9 लाख 71 हजार इतकी आहे. सी. डी. रेशो 68 टक्के आहे. एकूण सभासद संख्या 1120 इतकी आहे. धन्वंतरी महिला पतसंस्था विनम्र व तत्पर सुविधा, नवीन कोअर बँकिंग सुविधेमुळे लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्यावर्षी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पतसंस्थेचे स्थलांतर रणरागिनी महिला मंचच्या अध्यक्ष धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाल्यापासून संस्थेचा प्रगतीचा आलेख हा नेहमी चढता राहिला आहे असे डॉ. गाडेकर म्हणाल्या. पतसंस्थेने आता पर्यंत गरजु आणि होतकरू महिला, बेरोजगार, छोटे-मोठे व्यापारी, दुग्धव्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, भाजी पाला व्यापारी, चहा दुकानदार यांना कर्ज वितरण करून पेठेमध्ये उभे करण्याचे काम केले आहे. धन्वंतरी महिला पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये व्हा.चेअरपर्सन छाया निसळ, उषा दंडवते, सुवर्णा कोल्हे, पौर्णिमा गांधी, मनीषा मेहेत्रे, प्रमिला भुजबळ, आशा बनकर, अलका कांबळे, छाया रनमाळे, व्यवस्थापक संतोष माळवदे, सचिन मेहेत्रे, अविनाश त्रिभुवन, अंजली बोठे तसेच दैनिक मंगल ठेव प्रतिनिधी यांचे मोठे योगदान आहे.

COMMENTS