Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोपरगाव ः शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अजोड योगदान देणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स

राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह : मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
पांडुरंगा आता तरी दर्शन देशील का.. ?l Lok News24
उध्दव महाराजांनी वडुलेचे नाव राज्यात पोहचवले

कोपरगाव ः शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अजोड योगदान देणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या 103 व्या जयंती निमित्त शनिवार (दि.06) रोजी सकाळी 9.00 वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.
             सालाबाद प्रमाणे याहिवर्षी स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या 103 व्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या जयंती कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समुह व काळे परिवारावर प्रेम करणार्‍या हितचिंतक, कोपरगाव मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच रयत परिवाराने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे.

COMMENTS