Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यातील टेलरच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड

दोन वर्षांंनंतर आरोपील अटक करण्यात यश ; बंदुक जप्त

देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणार्‍या एका तरुणाची बंदुकीची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. सुमारे दोन वर्षा नंतर

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
पळणारे तीन आरोपी पकडले…त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे सापडले
सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?

देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणार्‍या एका तरुणाची बंदुकीची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. सुमारे दोन वर्षा नंतर या घटनेतील आरोपीला राहुरी पोलीस पथकाने पकडून गजाआड केले आणि त्याच्यावर खूणाचा गून्हा दाखल करण्यात आला. तब्बल दोन वर्षांनी या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कानून के हाथ लंबे होते है. अशी म्हण या ठिकाणी लागू पडते.राहुरी पोलिस पथकाचे सामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.
            राहुरी तालूक्यातील गूंजाळे येथील प्रदिप एकनाथ पागिरे हा टेलर काम करुन त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरासमोरच त्याचे दुकान असल्याने गावातील अक्षय कारभारी नवले हा मयत प्रदिप याच्याकडे नेहमी येत होता. सुमारे दोन वर्षापूर्वी 31 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8.30 वाजे दरम्यान मयत प्रदीप एकनाथ पागिरे हा त्याच्या दुकानात काम करत होता. त्यावेळी मयत प्रदिप पागीरे जवळ तेथे अक्षय नवले हा होता. त्यावेळी काहीतरी कारणावरुन अक्षय नवले याने प्रदिप पागीरे याच्या नाकावर बंदुकीतून गोळी मारली. ती गोळी प्रदिप याच्या मानेत जाऊन अडकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदिपला अक्षय नवले याने त्याच्या गाडीतून अहमदनगर येथील एका रुग्णालयात नेले. तेव्हा अक्षय नवले याने प्रदिप पागीरे याला रुग्णालयात दाखल करून गाडी पार्किंग करुन येतो. असे सांगून त्या ठिकाणाहून तो पसार झाला. त्यावेळी प्रदिप हा रुग्णालयात उपचारा पूर्वीच मयत झाला होता. कोणताही साक्ष पुरावा नसल्याने तसेच मयत प्रदीप पागिरे याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, हे समजू शकले नव्हते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यात 20/2022 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गून्ह्याचा तपास राहुरी पोलीसांकडुन सुरु होता. या दरम्यान मयत प्रदीप पागीरे याच्या नातेवाईकांना प्रदिप याच्या हत्ये बाबत गावातून थोडीफार माहिती मिळाली. आणि त्यांचा अक्षय नवले याच्यावर संशय आला. त्यानंतर काल मयत प्रदीप एकनाथ पागीरे याचा भाऊ अविनाश एकनाथ पागिरे, वय 36 वर्षे, रा. गुंजाळे, ता. राहुरी. यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कारभारी नवले, रा. गुंजाळे, ता राहुरी. याच्यावर गून्हा रजि. नं. 342/2024 भादंवि कलम 302, शस्त्र अधिनियम, 1959 चे कलम 25/3 प्रमाणे खूण व आर्म क्टचा गून्हा दाखल करण्यात आला. राहुरी पोलिस पथकाने आरोपीला तात्काळ पकडून गजाआड केले. तसेच त्याच्याकडून प्रदिप पागीरे याच्या हत्येच्या वेळी वापरलेली बंदुक जप्त करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मात्र तब्बल दोन वर्षा नंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून गजाआड करण्यात आले. त्यामुळे कानून के हाथ लंबे होते है. अशी म्हण राहुरी पोलिसांबाबत लागू होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांमधून राहुरी पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.

COMMENTS