कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय संरचनेत सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या नमुन्यांचा (व्हेरियंट) अभ्यास करण्यासाठी विषाणुचा जनुकीय क्रम तपासला जाणार आहे. कोणता 'व्हेरियंट' जास्त धोकादायक ठरू शकतो, त्यावर लसीचा परिणाम काय होतो, प्रसाराचा वेग किती हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
पुणे : कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय संरचनेत सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या नमुन्यांचा (व्हेरियंट) अभ्यास करण्यासाठी विषाणुचा जनुकीय क्रम तपासला जाणार आहे. कोणता ‘व्हेरियंट’ जास्त धोकादायक ठरू शकतो, त्यावर लसीचा परिणाम काय होतो, प्रसाराचा वेग किती हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनच्या अर्थसाहाय्यातून पुण्यासह हैदराबाद, बंगळुरू, दिल्लीतल्या संशोधन संस्था या अभ्यासात सहभागी होणार आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि आयआयएसईआर या दोन्हीसह देशातल्या २० संस्थांचा यात समावेश आहे. या २० संस्थांमध्ये देशभरातील प्रातिनिधिक ‘व्हेरियंट्स’चा अभ्यास होईल. एमआरएनएच्या सिक्वेन्सचा अभ्यास जनुकीय क्रमात केला जातो. सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान आणि सर्व्हेलन्स म्हणजे तंत्रज्ञानाचे सर्वेक्षण. कोविड-१९ चे बदलते व्हेरियंटची संख्या याच्या वेगवान अभ्यासाची गरज लक्षात आल्याने जीनोम सर्व्हेलन्सच्या प्रक्रियेला आणखी वेग येणार आहे. यामुळे लसींची परिणामकारकता कमी होत आहे का आणि होत असल्यास त्यात कोणते बदल करावे लागतील, तिसरी लाट रोखण्यासाठी काय पावले उचलावी लागतील, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे
COMMENTS