Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘वंचित’ लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार

अकोला प्रतिनिधी - ठाकरे गटाने बुधवारी सकाळी लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी राज्यातील

ओबीसींना फसवण्यासाठीच जरांगे-फडणवीसांचे भांडण
मविआच्या बैठकीला आंबेडकर मारणार दांडी ?
लाचारी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर  

अकोला प्रतिनिधी – ठाकरे गटाने बुधवारी सकाळी लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी राज्यातील पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.  वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात मंगळवारी वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र राज्य समितीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी राज्य समितीने आठ नावे निश्चित केली आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या समितीने नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. या नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक लढविल्यास पाठिंबा देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तर आज बुधवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल.

रामटेक –

भंडारा-गोंदिया- संजय गजानंद केवट

गडचिरोली-चिमूर -हितेश पांडुरंग मडावी

चंद्रपुर -राजेश वारलुजी बेले

बुलढाणा -वसंत राजाराम मगर

अकोला- प्रकाश यशवंत आंबेडकर

अमरावती -कुमारी पर्जक्ता तारकेश्वर पिल्लेवान

वर्धा- प्रा.राजेंद्र साळुंके

यवतमाळ-वाशीम – सुभाष खेमसिंग पवार

COMMENTS