Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्याचे विविध स्पर्धा परीक्षेत यश 

लोणी - महाराष्ट्र शासनामार्फत  सरळ सेवा भरतीच्या विविध स्पर्धा परिक्षेत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेते

संगमनेरकरांच्या आनंदात खोडा घालण्याची स्टंटबाजी ः सोमेश्‍वर दिवटे
मुश्रीफांची झाली अखेर…नगरपासून सुटका
लोकजीवनातील भीती गांधी मार्गाने दूर करण्याची गरज : अरुण खोरे

लोणी – महाराष्ट्र शासनामार्फत  सरळ सेवा भरतीच्या विविध स्पर्धा परिक्षेत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेते अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी विविध स्यर्धेत यश संपादन केले आहे. प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका यातील विकास कांगने ( तलाठी सोलापूर  जिल्हा ),प्रदीप देठे (तलाठी पुणे जिल्हा ) ,सुमित खर्डे (कृषी सेवक नाशिक विभाग ) सागर शामराव रणमाळे  (कनिष्ठ अभियंता पालघर जिल्हा परिषद )  गणेश घोरपडे (कनिष्ठ अभियंता महजेनको ) गीता विकास शिंदे (पवित्र पोर्टल रयत शिक्षण संस्था )  

 यांची निवड झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचा उपयोग होत असून यातील सोयी सुविधा आणि मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी विविध परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करू लागले आहेत असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई  विखे पाटील यांनी सांगीतले. संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा स्पर्धा केंद्राच्या मार्फत शिर्डी, राहाता, लोणी, कोल्हार, पाथरे आश्वी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिका सुरू करण्यात  आहेत सर्व परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, संस्थेचे सचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संचालक शिक्षण प्रदीप दिघे, संचालिका लिलावती सरोदे आश्वी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. महेश खर्डे,  पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे लोणीचे कॅम्पस डायरेक्टर  डॉ राम पवार यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सेलचे समन्वयक डॉ शैलेश कवडे देशमुख सह समन्वयक प्रा.योगेश आहेर आणि प्रा.शिवाजी  बुचुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

COMMENTS