Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात दहशतवाद्यांनी वापरलेली इमारत जप्त

राष्ट्रीय तपास यंत्रणांनी केली कारवाई

पुणे : पुणे शहरामध्ये दहशतवाद्यांचे वाढते वास्तव कारवायांमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अनेकवेळेस छापे टाकत, दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्

सर्वांनी कोरोना लस घ्या, मात्र सोबतच पूर्णपणे सतर्क राहा : पंतपधान नरेंद मोदी
राज्यात 1 फेबु्वारीपासून तमाशाचे फड पुन्हा होणार सुरू
उत्तरप्रदेशमध्ये बॉम्ब बनवतांना स्फोट

पुणे : पुणे शहरामध्ये दहशतवाद्यांचे वाढते वास्तव कारवायांमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अनेकवेळेस छापे टाकत, दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या दहशतवाद्यांकडून अनेक जिल्ह्यात बॉम्बस्फोट घडवण्याच्या योजना आखण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली. मोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. 2 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले. त्यानंतर त्याला तपासासाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. कोंढव्यात त्यांनी बाँम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने पथकाने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली.

COMMENTS