Homeताज्या बातम्यादेश

देशात महिला मतदारांची संख्या वाढली – मुख्य निवडणूक अधिकार राजीव कुमार

नवी दिल्ली प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मतदार देखील निवडणुकीसाठी उत्साही दिसत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असले

Breaking अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल
डॉक्टरांच्याकडे तपासणीसाठी आले असताना बंद पडले हृदय.
राघव चड्ढा- परिणीती चोप्राने साखरपुडा उरकला ?

नवी दिल्ली प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मतदार देखील निवडणुकीसाठी उत्साही दिसत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात निवडणूक एका उत्सवाप्रमाणे आहे. असे मुख्य निवडणूक अधिकार राजीव कुमार यांनी म्हटले आहे. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.

देशात २ लाखाहून अधिक मतदार १०० वर्षाचे आहेत. देशात १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या घरी जाऊन मतदान करुन घेणार आहोत. देशात साडेदहा लाख बुथ आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होणार आहेत. हिंसामुक्त निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. देशात ४७ कोटी महिला तर ४९ कोटी पुरुष मतदार आहेत. २ वेळा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार. पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही.

COMMENTS