Homeताज्या बातम्यादेश

निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक जाहीर करा

सर्वोच्च न्यायालयाची एसबीआयला नोटीस

नवी दिल्ली ः केंद्र सरकारची निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्यानंतर एसबीआय बँकेला यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञाप

आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग मारहाण, धक्कादायक घटना | DAINIK LOKMNTHAN
चिठ्ठी लिहून महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या.
ओबीसींना न्याय

नवी दिल्ली ः केंद्र सरकारची निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्यानंतर एसबीआय बँकेला यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यासंदर्भात बँकेकडून टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर न्यायालयाने फटकारल्यानंतर एसबीआयने निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. या तपशीलामध्ये कुणी किती रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या व्यक्तीने वा कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी दिला, याची माहिती मात्र समोर येऊ शकली नव्हती. आता यासंदर्भात महत्त्वाचा घटक असणारा निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला नोटीस जारी केली आहे.

एसबीआयने दिलेली माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार्‍या एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेने सर्व निवडणूक रोख्यांचे विशेष क्रमांक जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने यासंदर्भात एसबीआयला विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंदर्भातली सर्वोच्च न्यायालयाच्या ताब्यात दिलेली सीलबंद माहिती आयोगाला पुन्हा देण्याचीही न्यायालयाने यावेळी परवानगी दिली. एसबीआयकडून माहिती जाहीर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली तेव्हाच प्रत्येक निवडणूक रोख्याला देण्यात आलेल्या विशेष क्रमांकावरही युक्तिवाद झाला. कुणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला, हे समजण्यासाठी हा विशेष क्रमांक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या एसबीआयने जाहीर केलेली माहिती दोन प्रकारांमध्ये विभागलेली आहे. कुणी किती रकमेचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रकमेचे निवडणूक रोखे मिळाले या प्रकारची वेगवेगळी माहिती सध्या एसबीआयनं जाहीर केली असून प्रत्येक निवडणूक रोख्यांना असणार्‍या या विशेष क्रमांकाच्या मदतीने कुणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे!

8 हजार 633 कोटींचे रोखे भाजपच्या नावावर – निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक रोखे तपशीलानुसार 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या काळात तब्बल 22 हजार 217 कोटींचे निवडणूक रोखे राजकीय पक्षांच्या नावे जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 8 हजार 633 कोटींचे रोखे एकट्या भाजपाच्या नावावर आहेत, तर तृणमूल काँग्रेस दुसर्‍या आणि काँग्रेस तिसर्‍या स्थानावर आहे. भाजपाला मिळालेल्या रोख्यांपेकी आत्तापर्यंत भाजपने 6 हजार 06 कोटींचे रोखे वटवलेही आहेत. जानेवारी महिन्यातही भाजपने 200 कोटींचे रोखे वटवले आहेत.

COMMENTS