Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदूषित इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच

पुणे ः इंद्रायणी नदीत शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. मृत माशांचा खच डोहात तरंगताना ग्रामस

ओबीसी व मराठा समाजावर राज्य सरकारने मोठा अन्याय केला : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
शेवटी निकालापर्यंत पोहचलो !
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा

पुणे ः इंद्रायणी नदीत शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. मृत माशांचा खच डोहात तरंगताना ग्रामस्थांना दिसला. देहू येथील पर्यावरणप्रेमींनी देहू नगरपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत मृत मासे एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावली. प्रशासन इंद्रायणी नदी स्वच्छ कधी करणार असा सवाल स्थानिक करु लागले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा 13 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी राज्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात. या वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीत वारकरी स्नान करतात.

COMMENTS