Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठ्ठलराव वाडगे यांना सरपंच सेवा संघाचा पुरस्कार प्रदान

श्रीगोंदा शहर : सरपंचांच्या समस्या सोडविण्या बरोबरच गावच्या विकासासाठी राज्य व्यापी सरपंच सेवा संघ उत्तम काम करत आहे गेल्या 7 वर्षात संघाने विविध

मनपात जगताप समर्थकांनी गुंडगिरी व धुडगूस घातला : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळेंचा आरोप
मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट बेचिराख होता होता राहिला…
नगरपालिका शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन

श्रीगोंदा शहर : सरपंचांच्या समस्या सोडविण्या बरोबरच गावच्या विकासासाठी राज्य व्यापी सरपंच सेवा संघ उत्तम काम करत आहे गेल्या 7 वर्षात संघाने विविध उपक्रम राबवले आता त्याच बरोबर संघाने आणि सरपंचांनी लेक वाचवा चळवळ मध्ये सहभागी होण्या ची गरज आहे कारण लेक वाचली तरच जग वाचेल त्यामूळे गावातील सरपंच ही चळवळ यशस्वी करू शकतोअसे प्रतिपादन लेक वाचवा चळवळ राबविणार्‍या प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी नगर येथे माऊली संकुलात राज्य सरपंच सेवा संघ आयोजित राज्य स्तरीय पुरस्कार सोहळ्यात बोलताना केले.
सरपंच सेवा संघ संस्थापक यादवराव पावसे अध्यक्ष स्थानी होते. डॉ. कांकरिया पुढे म्हणाल्या स्त्री पुरुष समानता काळात मुलींचा जन्म दर घटता दुर्देवी आहे. सरपंच आणि सामाजिक संघटना मिळून एकत्र काम केले तर स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. यादव राव पावसे यांनी संघाचा हेतू आणि राज्यात केलेल्या कार्याचा आढावा घेत सरपंच मानधन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत आदर्श काम करणार्‍या सरपंच आणि सहकार, कृषि, महिला सक्षमीकरण क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे सांगून भविष्यात संघ वाढीसाठी सरपंचांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी आदर्श सरपंच तसेच बचत गटांच्या आणि कृषि उत्पन्न बाजार समिती खाजगी च्या माध्यमातून कार्य करणार्‍या श्रीगोंदा येथील वृद्धेश्‍वर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांचा डॉ. सुधा कांकरिया, बाबासाहेब पावसे, यादव पावसे यांच्या हस्ते प्रदापुरस्कारन करण्यात आला. सोहळ्यास राज्याच्या विवीध जिल्ह्यातून शेकडो सरपंच, समाज सेवक उपस्थित होते.

COMMENTS