Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकचे आरोग्यदूत जगदीश पवार यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर  

नाशिक प्रतिनिधी - नाव जगदीश शंकर पवार असे उच्चारल्यास नाशिकरोड च्या बिटको हॉस्पिटलमध्ये असतील अशी दृढ भावना ही जण माणसात रुचली गेली. त्यावरून

माजी नगरसेवक जगदीश पवार यांच्या प्रयत्नांना यश
आरोग्यदूत जगदीश पवार यांचेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार  
बिटको रुग्णालयात तंत्रकुशल मनुष्यबळ हवे ; माजी नगरसेवक जगदीश पवार यांची मागणी  

नाशिक प्रतिनिधी – नाव जगदीश शंकर पवार असे उच्चारल्यास नाशिकरोड च्या बिटको हॉस्पिटलमध्ये असतील अशी दृढ भावना ही जण माणसात रुचली गेली. त्यावरून समजते ही तळमळ फक्त आणि फक्त जनसेवेसाठीच असते. नाहीतर वारंवार वेगवेगळ्या समस्यां सांगून जनतेकडे कानाडोळा करत आपले काम दुसऱ्यावर ढकलणारी मंडळी देखील समाजात कमी नाहीत मात्र जगदीश भाऊ म्हटलं की १००१ टक्का ते हॉस्पिटलमध्ये च बाहेर कुठेतरी घिरट्या घालत असतात. त्यांना ती चिंता सतावत असते ती म्हणजे आपले नाव घेऊन आलेले पेशंट हे बरे झाले आहेत की नाहीत ? काय समस्यां आहेत ? काळजी पूर्वक खात्री करून ऍडमिट जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत ही व्यक्ती जातीने डॉक्टरांच्या संपर्कात असते. असे देखील नाहीत की विशिष्ट वेळेस २४ तास बाराही महिने ही अखंड सेवा बजावणारा अवलिया म्हणजे जगदीश पवार. महापालिका निवडणुकीत हीच त्यांची ती कार्यकरण्याची शैलीने लोकांना ते आवडतात. म्हणूनच नगरसेवक ते आरोग्यसभापती देखील राहून गेले. त्यामुळे प्रचंड कामाचा ताण असतांना देखील आपली आरोग्य सेवा ही अविरत त्यांनी चालू ठेवली आहेत. म्हणूनच अखंड दिपणाऱ्या तेजाचा सत्कार महाराष्ट्र शासनाने करावयाचा ठरवला असून त्यांना सण २०२१-२२ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहेत. 

महाराष्ट्र शासन राज्यभरात दरवर्षी असे उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण ५१ व्यक्ती व १० संस्था अशा स्वरूपाने पुरस्कार देऊन त्यांना ऊर्जा व प्रेरणा देत आहेत. त्यामध्ये नाशिक चे आरोग्यदूत जगदीश शंकर पवार यांचा देखील नंबर लागल्याने सध्या त्यांच्या परिवारात व समर्थक यांच्यात आनंदाचे वातावरण आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय व विशेष विभागाकडून पुढील माहिती आपल्या वेबसाईटवर ( www.maharashtra.gov.in) वेळेत जाहीर करण्यात येईल.  

COMMENTS