Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईकरांना एप्रिलपासून मिळणार मोफत वैद्यकीय उपचार

मुख्यमंत्री शिंदे यांची आपला दवाखान्याला अचानक भेट

मुंबई : मुंबईकरांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघर

संथ मतदानाची होणार चौकशी
महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी
जेएनयुमध्ये मराठी अध्यासनासाठी निधी देणार

मुंबई : मुंबईकरांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच एप्रिलपासून शून्य औषध चिठ्ठी योजनेची अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास अचानक भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून मुंबईत 226 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत 42 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आपला दवाखानामध्ये रुग्णांना मोफत उपचार मिळत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. शून्य औषध चिठ्ठी योजनेची एप्रिलपासून अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दवाखान्यातील साठवणूक कक्ष, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्तागृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून आपल्या दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

COMMENTS