नाशिक प्रतिनिधी - अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबांना रेशन दुकानांमधून मोफत साडी वितरीत करण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६० हजा

नाशिक प्रतिनिधी – अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबांना रेशन दुकानांमधून मोफत साडी वितरीत करण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६० हजार ५१५ कुटुंबाना साडी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. परंतु, आवडीच्या रंगाची साडी मिळावी यासाठी महिला लाभार्थी हट्ट करीत असल्याने रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यातील अंत्योदय रेशनकार्डधारक लाभार्थींना वर्षभरात एकदा मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रेशन दुकानांमधून या साड्यांचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ५१५ अंत्योदय रेशनकार्डधारक आहेत. त्यांच्यासाठी साड्या उपलब्ध झाल्या आहेत. लाल, हिरवा, पिवळा व निळ्या अशा चार रंगात या साड्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार ६०९ रेशन दुकानांमधून या साड्या वितरणाला सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी साडी वाटपाचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
COMMENTS