Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शुगर या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

श्रीगोंदा शहर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा शुगर येथे युवा नेते पृथ्वीराज बाबा नागवडे, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक विठ्ठल बापू जंगले तस

लायन्स क्लब ऑफ राहाताने घेतल्या निबंध स्पर्धा
jalgaon : कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल श्रीमद यांचा सत्कार l LokNews24
 नाळ जुळली तर गावाचा विकास निश्‍चित ः जगधने

श्रीगोंदा शहर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा शुगर येथे युवा नेते पृथ्वीराज बाबा नागवडे, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक विठ्ठल बापू जंगले तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन 17 फेब्रुवारी 24 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शाळेतील बालकलाकारांनी पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलींचे शिक्षण, पोवाडा, लावणी, कोळी गीते, आदी विषयावरील गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.परिसरातील नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्वांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर देणगी रूपाने मोठ्या प्रमाणात कौतुकाची थाप दिली. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शिक्षक नेते,तसेच शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा शिर्के मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक रवींद्र होले, संदीप हिरवे, निर्मला डोंगरे, गीता वेठेकर, पिंकी पाचांगणे, अश्‍विनी पर्‍हे आदींनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्यांनी शाळेत राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांचे कौतुक करून शाळेला पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पालकांनी झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप कोकाटे, उपाध्यक्ष दत्तात्रय घालमे, लिंपणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती अलका भालेकर, माजी केंद्रप्रमुख विजय कुमार लंके, शिक्षण तज्ज्ञ सदस्य मधुकर काळाणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोकाटे, शिल्पाताई गायकवाड, माजी उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड, सुरेश पवार, अंबिका ताई शिंदे, संदीप जाधव, स्वाती सानप, माजी अध्यक्ष शशिकांत कोकाटे, कल्पनाताई कांबळे, निलेश जगताप, सुभाष कांबळे, आदिनाथ पाचपुते, सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर, अभिजीत राऊत, माजी मुख्याध्यापिका सीमा साळवे, नजमा शेख, शकुंतला लंके, संगीता होले, प्रकाश पटेकर, ईश्‍वर गोरे, संजय वेठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS