Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचा जागावाटपांचा तिढा कायम

राजधानीतच होणार शिक्कामोर्तब भाजप 32 जागांवर ठाम

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीच्या जागा वाटपांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत महायुतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्

गड ठरवणं हे शेलार मामा शिवाय कोण ठरवू शकतं ?
पुतण्याच्या लग्नात नाचताना काकाला हृदयविकाराचा झटका आला  
अग्नीपथचा अग्नीडोंब…नगरच्या रेल्वेने मागितला पोलिसांना बंदोबस्त

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीच्या जागा वाटपांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत महायुतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उशीरा रात्रीपर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत अमितशहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र या बैठकीत भाजपने 32, शिवसेनेला 10 तर राष्ट्रवादीला 6 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्या 13 खासदारांची तिकीटे कापू नका, अशी विनंती केल्यामुळे जागावाटपांचा तिढा आता दिल्लीत सुटणार आहे.
भाजप लोकसभेत 30 ते 32 जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला 10 ते 12 जागा, तर अजित पवार गटाला 6 ते 8 जागा मिळतील, असे अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 400 चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार हे रायगड, परभणी, बारामती, शिरुर आणि आणखी 2 जागांसाठी आग्रही आहेत. तर अजित पवारांना जागा सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे. काही जागांवर शिंदे-अजितदादांचे उमेदवार कमळ चिन्हावरही निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सह्याद्री गेस्टहाऊसवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊनशहा यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत सर्वकाही अंतिम करण्यात आले, मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खासदारांची तिकीटे कापू नका, असा सूर लावल्यामुळे जागावाटप आता दिल्लीतच होणार आहे. सुरुवातीला शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली, त्यानंतर हे दोन्ही नेते सह्याद्री गेस्ट हाऊसवरून निघाले. या दोघांनंतर शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेतली. दक्षिण मुंबई, उत्तर पश्‍चिम मुंबई, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, शिरूर, मावळ, गडचिरोली, नाशिक, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, अमरावती, माढा, सातारा या लोकसभा मतदार संघात दोन्ही पक्षांकडून दावा सांगितल्याचे बोलले जात आहे.

शिंदे-पवार मागे हटेनात – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौर्‍यात जागावाटपात सबुरीचा सल्ला दिला असला तरी, शिंदे आपल्या  13 जागांसाठी ठाम असल्याचे बोलले जात आहेत. दुसरीकडे अजित पवार 9 जागावर ठाम आहेत. तर तिसरीकडे भाजप 32 जागांसाठी आग्रही असल्याने महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शहा यांनी मुंबईत चाचपणी करून देखील मार्ग न निघल्याने भाजपचा जागावाटपाचा तिढा अखेर दिल्लीत ठरणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. कारण देवेंद्र फडणवीसांसह महाराष्ट्रातील महाराष्ट्र भाजपची कोअर टीम तातडीने दिल्लीत रवाना झाली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीतून तातडीने सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. पक्षांतर्गत चर्चेसाठी दोन्ही नेते गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. सत्तेत सहभागी होतांना जे आश्‍वासन आम्हाला देण्यात आले होते, ते पाळावे, अशी भूमिका राष्ट्रवादीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

COMMENTS