Homeताज्या बातम्यादेश

स्पॅनिश महिलेवरील बलात्कारप्रकरणी तिघांना अटक

रांची ः झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. 4 जणांचा शोध सुरू आह

कंगना रणौतने घेतले त्र्यंबकेश्वरचे दर्शन
कोल्ड ड्रिंकमध्ये निघाली पाल;किळसवाना व्हीडिओ व्हायरल
आशादायी अर्थसंकल्प !

रांची ः झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. 4 जणांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना रविवारी दुमका न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. जिल्ह्यातील हंसदिहा येथील कुंजी गावात शुक्रवारी रात्री स्पेनमधून फिरायला आलेल्या एका पर्यटकावर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केला. शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी आधी या तिघांना ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली. अटक करण्यात आलेले तीन आरोपी कुंजी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS