पेगॅसस प्रकरणी कुठलाही व्यवहार झाला नाही

Homeताज्या बातम्यादेश

पेगॅसस प्रकरणी कुठलाही व्यवहार झाला नाही

संरक्षण मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणी आक्रमक भूमिका घेत, सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सातत्याने विरोधकां

जुनी गाडी स्क्रॅप केल्यास नव्या वाहनाची नोंदणी मोफत ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा
बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
अश्‍लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश l DAINIK LOKMNTHAN

संरक्षण मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणी आक्रमक भूमिका घेत, सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून होत होती. अखेर याप्रकरणी भाष्य करत इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुप टेक्नॉलॉजीजसोबत सरकारचा कुठलाही व्यवहार झालेला नाही, असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत सांगितले. एनएसओ ग्रुप या कंपनीने पेगॅसस स्पायवेअर हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
डॉ. व्ही. शिवदसन यांनी यांनी राज्यसभेत सरकारला प्रश्‍न विचारला की, एनएसओ ग्रुपसोबत सरकारचा काही व्यवहार झाला आहे का? यावर लेखी उत्तर देताना संरक्षण मंत्रालयानं पेगॅसस स्नूपगेट प्रकरणात कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय किंवा कॅबिनेट सेक्रेटरी यांच्याकडून अद्याप पेगॅसस पाळत प्रकरणी कोणतंही निवेदन जाहीर करण्यात आलेले नाही. पेगॅसस प्रकरणात विविध विरोधीपक्ष नेत्यांचे, न्यायाधिशांचे, वकिलांचे, सरकारवर टीकात्मक लिखाण करणार्‍या पत्रकारांचे आणि काही मंत्र्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा करण्या आला आहे. आज (सोमवार) विरोधी खासदारांनी राज्यसभेत या प्रकरणावरुन मोठे रान उठवले आहे.

COMMENTS