Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र हॅकथॉनमध्ये अग्रणी टीम्सना पुरस्कार 

नाशिक: ऍमेझॉन इंडियाने लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टू एनहान्स लर्निंग या ना-नफा भागीदारांच्या सहकार्याने आज पुण्यात जिल्हा हॅकथॉनचा राज्यस्तरीय क

Sanjay Raut l शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निषेध करणाऱ्यांवर ‘राजद्रोहा’चा गुन्हा का? | LOKNews24
‘बाय बाय यश समीर’
 ज्येष्ठ कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प. मधुकर महाराज जाधव यांचे निधन  

नाशिक: ऍमेझॉन इंडियाने लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टू एनहान्स लर्निंग या ना-नफा भागीदारांच्या सहकार्याने आज पुण्यात जिल्हा हॅकथॉनचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्रातील औरंगाबाद, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर या शहरांतील ८९० हून अधिक शाळांमधून इयत्ता ४ ते ८ मधील २३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रतिभा आणि नाविन्यपूर्णता यांचे सादरीकरण होत असलेल्या जिल्हास्तरीय हॅकाथॉनमध्ये भाग घेतला. हैकथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील सांभाजी नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेफाल विजेता ठरली आहे. त्यांच्या खालोखाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्या मंदिर तिरपन, कोल्हापूर, महाराष्ट्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुलवंची, सोलापूर, महाराष्ट्र यांचा क्रम लागला आहे.प्रत्येक जिल्ह्यातील आघाडीच्या गटांनी वरिष्ठ पॅनलसमोर त्यांची प्रकल्प सादर केली. या पॅनलमध्ये श्रीमती शोभा खंडारे, संयुक्त संचालक, एमएससीईआरटी, श्रीमती संध्या गायकवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद, श्री. राजेश बंकर, प्राचार्य, डायट अहमदनगर, श्री. अरुण जाधव, विभाग प्रमुख, सीपीडी, एमएससीईआरटी, श्री. श्याम मकरानपुरे, प्रकल्प प्रमुख, वीएसके, समग्र शिक्षा; श्री. शिवाजी औटी, वरिष्ठ व्याख्याता, डायट, नाशिक, अक्षय कश्यप, प्रमुख, अमेझॅन फ्यूचर इंजिनियर, अमेझॅन इंडिया यांचा समावेश होता. अमेझॅनच्या कार्यालयात आयोजित या हॅकॅथॉनचा उद्देश कार्यशाळा आणि सहयोगी प्रकल्प विकासाच्या माध्यमातून सहभागींना प्रगत कोडिंग आणि रोबोटिक्स कौशल्यांनी सुसज्ज करणे हा होता.हॅकथॉन प्रकल्प विद्यार्थ्यांच्या समुदायांना भेडसावणाऱ्या वास्तव-जगातील आव्हानांना सादर करणारे होते. तरुण मनांना समस्या सोडवणारे आणि नवनिर्माते बनण्यात या कार्यक्रमाचा असलेला प्रभाव यातून दिसून आला. विजेत्या संघांना त्यांची सर्जनशीलता आणि समर्पणाप्रती मान्यता मिळवून देत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या पलीकडे जाऊन हॅकथॉनने सहयोग, महत्वपूर्ण विचार आणि समस्या सोडवणे यासारख्या २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्यांना चालना देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. पुण्यात आयोजित राज्यस्तरीय हॅकथॉन दरम्यान, सहभागी जिल्ह्यांतील ४२ विद्यार्थी आणि १४ शिक्षकांनी स्क्रॅच आणि अर्डिनो किट्स वापरून कोडिंग प्रकल्पांवर काम केले. या अनुभवाने त्यांना त्यांच्या नव्याने मिळवलेल्या ज्ञानाचा वास्तविक-जगातील समस्या सोडवण्यासाठी उपयोग करण्याची आणि त्यांच्या समुदायांमध्ये योगदान देण्याची संधी दिली. उद्योगक्षेत्रातील तज्ञांसोबत शिक्षण आणि संवाद साधून विद्यार्थ्यांनी संगणक विज्ञानाच्या जगाबद्दल आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल मौल्यवान माहिती मिळवली. ऍमेझॉन इंडिया, ऍमेझॉन फ्युचर इंजिनिअर लीड अक्षय कश्यप यांनी सर्व विद्यार्थ्यांप्रती विशेषत: ज्यांना मर्यादित संधी आहेत त्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्यांनी परिपूर्ण करण्यासाठी असलेले ऍमेझॉनचे समर्पण अधोरेखित केले. ते म्हणाले, “तंत्रज्ञान सकारात्मक बदलांना चालना देते आणि प्रत्येकाला त्याचा एक भाग होण्यासाठी सक्षम बनवण्यावर आमचा विश्वास आहे. ऍमेझॉन फ्यूचर इंजिनिअर प्रोग्रामची कॉम्प्युटर सायन्स हॅकथॉन, जिल्हा स्तरावर सुरू होणारी आणि या राज्यव्यापी पातळीपर्यंत पोहोचणारी स्पर्धा विद्यार्थी आणि शिक्षकांना कोडींग आणि नावीन्यतेची अमर्याद क्षमता खुली करण्यासाठी एक अतुलनीय व्यासपीठ प्रदान करते.” त्यांनी शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही भर दिला. ते म्हणाले, “ज्या शिक्षकांनी आपल्या वर्गात संगणक विज्ञान आणणे स्वीकारले ते बदलाचे प्रमुख घटक आहेत. या सहयोगी प्रयत्नाबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकार आणि आमच्या भागीदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करणाऱ्या भविष्यातील प्रयत्नपूर्वक वाटचालीची आम्ही वाट पाहत आहोत.”

COMMENTS