Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा

सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण आदेश

पारनेर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरणाचा निकाल लवकर लावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी या खटल्यातील आरोप

राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सभापती घुलेंवर टक्केवारीचा आरोप
नरेंद्र फिराेदिया ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने गौरवीत
शिर्डीत साईंच्या जयघोषात रंगांची उधळण

पारनेर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरणाचा निकाल लवकर लावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी या खटल्यातील आरोपी बबन कवाद याने सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. यातील आरोपी कवाद जामीनावर बाहेर असुन अहमदनगर व पुणे जिल्ह्यात वराळ खून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रवेश करण्यास त्याला मनाई केलेली आहे.
वराळ खून प्रकरण सात वर्षे उलटुनही निकाली निघत नाही. म्हणून, आरोपी कवाद याने त्याच्यावरील दोन जिल्हयातील प्रवेश बंदीची अट शिथिल करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु प्रवेश बंदी शिथिल करण्यासाठी दिलेले कारण योग्य वाटत नाही असे म्हणत, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मागणीस  नकार  दिला. या घटनेला अनेक वर्षे उलटुनही खटला निकाली निघत नाही म्हणून न्यायालयाने नाराजी व्यक्त करत. या प्रकरणाची दखल घेवून हा खटला लवकरात लवकर निकाली काढावा असे निर्देश अहमदनगर सत्र न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणाची सुनावनी न्यायमूर्ती अनिवृध्द बोस व न्यायमूर्ती संजय कुमार यांचे न्याय पिठासमोर झाली. याचिकाकर्ता बबन कवाद यांची बाजु अ‍ॅड प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे, पुलकित अग्रवाल यांनी मांडली.

COMMENTS