Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मिळणार एकरकमी लाभ

मुंबई : अंगणवाडी कर्मचार्‍यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या  निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5 हजार 605 अंगणवाडी क

साईचरणी वाबळे यांच्याकडून सुवर्णजडीत रुद्राक्ष माला दान
आयपीएल वर लावला सट्टा आरोपींच्या आयुष्याची झाली थट्टा
नाशिकमध्य मतदारसंघ संयोजकपदी व्यंकटेश मोरे

मुंबई : अंगणवाडी कर्मचार्‍यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या  निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचार्‍यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये 1 लाखापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75 हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या 1 एप्रिल, 2022 पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा लाभ देताना शासन निर्णय 30 एप्रिल 2024 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणार्‍या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS