नाशिक प्रतिनिधी - श्रीमद भागवत सर्वासाठी आहे. चित्ताच्या एकाग्रतेसाठी उपासना आवश्यक आहे. भक्तीपूर्वक कर्म केल्याने चित्त एकाग्र होत असते. भक्ती उ

नाशिक प्रतिनिधी – श्रीमद भागवत सर्वासाठी आहे. चित्ताच्या एकाग्रतेसाठी उपासना आवश्यक आहे. भक्तीपूर्वक कर्म केल्याने चित्त एकाग्र होत असते. भक्ती उपासना मनाला एकाग्र करते. ईश्वरात मन एकाग्र झाल्यास ज्ञानाची प्राप्ती होते, असे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉ तुळशीराम महाराज गुट्टे यांनी व्यक्त केले. पंचवटीतील नवीन आडगाव नाका येथील विजय नगर कॉलनीत प्रणित मिञ मंडळातर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथेचा समारोप झाला.यावेळी मनपा चे माजी सभागृह नेते कमलेश बोडके, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, सामाजिक कार्यकर्ते
दिपक डोळसे, राहुल दराडे, किशोर ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ गुट्टे महाराज म्हणाले की, सर्व वृत्ती व संकल्प श्री कृष्ण चरणकमल आश्रित अन् त्यांच्या सेवेतच रत राहावेत. आपले कर्म स्वच्छ करून भाव शुद्ध ठेवा. चितशुद्धीसाठी योगिजन ध्यान धारणा प्रत्ययाहार प्राणायाम आदी करतात. मनाला परमेश्वराच्या कोणत्याही स्वरूपात विवेकपूर्ण स्थिर करा. भगवंताने पवित्र विचार करण्यासाठीच बुद्धी व मन दिले असल्याचे त्यांनी विविध दाखले देत विषद केले. श्रीमदभागवत ग्रंथाची कथास्थळ परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भाविकांनी महा प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बाबासाहेब सानप, मुरलीधर अकोटकर, वसंतराव पुंड, प्रणित सानप, यांच्यासह प्रणित मित्रमंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS