Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत भगरीमुळे 100 जणांना विषबाधा

हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्यामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक गावकर्‍यांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकि

उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी म्हणून अरविंद सावते सन्मानीत
अहमदपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीने मारली बाजी
लोक म्हणाले पिऊन पडलाय, त्याने ओळखलं पोलिसाला हार्ट अटॅक आलाय

हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्यामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक गावकर्‍यांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गावातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तातडीने गावात आरोग्य पथक पाठवून गावात उपचाराची व्यवस्था केली आहे. कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे मागील पाच दिवसांपासून धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमात सायंकाळी भगर व शेंगदाण्याची चटणी देण्यात आली होती. त्यासाठी सोडेगाव येथील दुकानातून भगर आणण्यात आली होती.

COMMENTS