Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकले

सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता ?

बारामती ः लोकसभा निवडणुकीत तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही विचलित होऊ नका, असे आवाहन उपमुख

काळे परिवाराच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याचे भाग्य
वय झाले, आतातरी थांबणार की नाही ?
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

बारामती ः लोकसभा निवडणुकीत तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही विचलित होऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे. मला तुमची साथ आहे. तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही जोपर्यंत एकजूट आहात तोपर्यंत माझे काम अशाच तडफेने चालत राहील. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. काहीजण तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्‍न सुटत नाही. भावनिक झाल्याने कामे होत नाहीत. काम हे तडफेनेच करावे लागते. पूर्ण जोर लावूनच काम करावे लागते, असेही अजित पवार म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या लढाईत अजित पवार यांच्या गटाने बाजी मारली. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शरद पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता. याच पार्श्‍वभूमीवर अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. बारामती मतदारसंघातून त्या तीनदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी मोहीम सुरू केल्याची माहिती आहे. त्यांच्या फोटोसह वाहन परिसरात फिरताना दिसत आहेत. वाहनावर सुनेत्रा आणि अजित पवार या दोघांचा फोटो असलेले फ्लेक्स बॅनर लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत एकदाही निवडणूक लढलेली नाही. मात्र, पर्यावरण आणि महिलांशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. माध्यमांत झळकत असलेल्या बातम्यांनुसार, अजित पवार यांचे निकटवर्तीय वीरधवल जगदाळे यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. याबाबत वीरधवल जगदाळे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पत्रे लिहिली होती.

COMMENTS