पुणे ः राज्यातील बर्याच भागात तापमान वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. मात्र, अनेक भागात रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. हवामान विभागाने दि
पुणे ः राज्यातील बर्याच भागात तापमान वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. मात्र, अनेक भागात रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज शनिवार आणि उद्या रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.
राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे येत्या शनिवारी आणि रविवारी ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या भागात आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच शनिवार, रविवारी पावसाची शक्यता आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोलीत शनिवारी (10 फेब्रुवारी) आणि रविवारी (11 फेब्रुवारी) पावसाच्या हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुबंईसह कोकणात मात्र आकाश निरभ्र राहील, या ठिकाणी थंडी आहे तशीच जाणवेल. पावसाची शक्यता मात्र तिथे जाणवत नाही. हवामान खात्याने अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे.
COMMENTS