नाशिक- उपवनसंरक्षक, पश्चिम भाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, हरसूल (प्रा) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात 6 फेब्रुवारी रोजी मध
नाशिक- उपवनसंरक्षक, पश्चिम भाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, हरसूल (प्रा) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 3.00 वाजता आपल्या स्टाफसह साफळा रचून आडगाव ते टोकपाडा रस्त्यालगत संशयित आयशर वाहन क्रमांक एमचएच-04/ डीएस-5700 या वाहनाला मुद्देमालासह ताब्यात घेवून कार्यवाही केली आहे. अशी माहिती उपवनसंरक्षक, पश्चिम भाग, नाशिक पंकज गर्ग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सदर वाहनास आडविण्याचा प्रयत्न केला असता आयसर वाहन चालकाने कर्मचारी पथकावर वाहन नेण्याच्या प्रयत्नात वाहन रस्त्यालगतच्या चारीत गेले व अंधाराचा फायदा घेत वाहनचालक व इतर इसम फरार झाले. आयशर वाहन क्रमांक एमचएच-04/ डीएस-5700 हे ताब्यात घेवून हरसूल वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून त्याची तपासाणी केली असता सदर वाहनाची अंदाजे किंमत रूपये 3 लाख इतकी असून वाहनातील 36 नग खैर, घ.मि.- 0.607 रक्कम रूपये 6 हजार 400 इतक्या रकमेचा माल जप्त करण्यात आला आहे.
विनापरवाना वाहतूक होत असल्याने वनविभागाच्या पथकाने भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलामान्वये राउंड गुन्हा क्रमांक T-7/ 2023-24 नोंद केला असून गुन्हाकामी कागदपत्र तयार करून वनपाल आडगाव यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.
सदरची मोहिम हरसुल वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे, वनपाल अमित साळवे, सुनिल टोंगारे, पद्माकर नाईक, वनरक्षक गजानन कळंबे, मनोहर भोये व वाहनचालक संजय भगरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे उपवनसंरक्षक, पश्चिम भाग, नाशिक पंकज गर्ग यांनी कळविले आहे.
COMMENTS