Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश भोसने बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये पटकावले ब्राँझपदक

श्रीगोंदा शहर : कालिकत येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच गणेश भोस याने ब्राँझ म

राष्ट्रीय परिषदेतून तंत्रज्ञानाच्या माहितीचा विस्तार ः डॉ. गुल्हाने
३ मिनटात जाणूनघ्या दिवसभरातील २४ ठळक बातम्या | सुपरफास्ट २४ | LokNews24
ब्राम्हणगावात जागर लोकशाहीचा महोत्सव उत्साहात

श्रीगोंदा शहर : कालिकत येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच गणेश भोस याने ब्राँझ मेडल प्राप्त केले. या वर्षीचा नगर श्री व विद्यापीठ श्री बहुमान त्याने मिळवला. गणेश श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला गावाचा रहिवासी असून त्याने प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केले व पदवी पर्यंतचे शिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात पूर्ण करून याच महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात असतानाच त्याला कुस्तीची आवड होती त्यामध्ये त्याने जिल्हा व विभागीय स्तरावर यश प्राप्त केले होते. त्यामुळे त्याला सहाजिकच व्यायामाची आवड होती. त्याने शरीर पिळदार स्नायूंचे असावे म्हणून जिमचा व्यायाम सुरु केला. जिमच्या व्यायामामुळे बॉडी बिल्डींग मध्ये आवड निर्माण झाली व बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करण्याचे ध्येय ठरवून राष्ट्रीय पंच किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे त्यांच्या घरी राहून सराव सुरू केला. या स्पर्धेसाठी त्याच्या कुटुंबातील आजी-आजोबा, आईवडील व नातेवाईकांची खंबीर साथ मिळाली तसेच महाविद्यालयाच्या शा.शिक्षण संचालिका बागुल कल्पना व क्रीडा शिक्षक संजय डफळ यांच्या मार्गदर्शनामुळे गणेश बोस याचे ध्येय प्रत्यक्ष पूर्ण झाले. या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल दादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे पर्यवेक्षक रत्नाकर झिटे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS