Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी हक्क संघर्ष समितीचा रास्ता रोको

हिंगोली ः जिल्ह्यातील धरणे व नद्यांचे पाणी पळवणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पाणी हक्क संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीच्या कळमनुर

भावना अन् बुद्धी कृत्रिम बुद्धिमत्तेला सरेंडर करु नका : प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर
महिलेची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी
गोराई पर्यटनस्थळ विकासासाठी आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

हिंगोली ः जिल्ह्यातील धरणे व नद्यांचे पाणी पळवणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पाणी हक्क संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा येथे शेकडो ग्रामस्थांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग रोखला. या आंदोलकांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर रोखून धरला. यावेळी आंदोलकांनी सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. या रास्ता रोको आंदोलनामुळे हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती. या रास्ता रोको आंदोलन दरम्यान प्रशासनाने आंदोलकांची भेट घेतली.

COMMENTS