Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज

मुंबई प्रतिनिधी - अज्ञात क्रमांकावरुन मुंबई पोलिसांनी धमकीचा मेसेज आलाय. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मसेजमध्ये देण्य

जोगेश्वरी आणि भैरवनाथाचा अलौकिक विवाहसोहळा 
आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू
सूरज रसाळ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष

मुंबई प्रतिनिधी – अज्ञात क्रमांकावरुन मुंबई पोलिसांनी धमकीचा मेसेज आलाय. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मसेजमध्ये देण्यात आली आहे. बुधवारी रात्री पुणे पोलिसांनाही असाच धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आलाय. या धमकीच्या मेसेजनंतर पोलीस सतर्क झालेय. तपास तात्काळ सुरु झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा एक मेसेज आला आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. 

COMMENTS