Homeताज्या बातम्यामनोरंजन

फुकरे फेम अभिनेता पुलकित सम्राटने गुपचूप उरकला साखरपुडा

मुंबई प्रतिनिधी - बॉलीवूडचा देखणा अभिनेता पुलकित सम्राट आणि सुंदर अभिनेत्री क्रिती खरबंदा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे कपल क

राहुरीत आरपीआयच्या बंदला हिसंक वळण
सावेडीतील बहुचर्चित रस्ता अखेर गुंडाळला ; अर्धवट अवस्थेतील काम मनपाने केले रद्द, शासनाला पैसेही परत पाठवले
काँगे्रसला गटबाजीचे ग्रहण

मुंबई प्रतिनिधी – बॉलीवूडचा देखणा अभिनेता पुलकित सम्राट आणि सुंदर अभिनेत्री क्रिती खरबंदा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे कपल केवळ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासाठीच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत आहे. त्यांची जोडी चाहत्यांना आवडते. बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या या कपलबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता लवकरच दुसरं लग्न करणार

इंस्टाग्राम पेज रिया लुथरा हिने पुलकित-क्रितीच्या रोका सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी कपल कुटुंबासोबत दिसत आहे. रोका सोहळ्याचा आनंद पुलकित आणि क्रिती या दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळतो. पुलकितने हा फोटो क्रितीला हातात घेऊन क्लिक केला आहे. फोटोसेशन दरम्यान दोघेही रिंग्ज फ्लाँट करताना दिसतात. पुलकित सम्राटने या सोहळ्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही छायाचित्रे समोर येताच कमेंट विभागात या जोडप्यासाठी अभिनंदनाचा पूर आला. मात्र, पुलकित किंवा क्रितीने अधिकृतपणे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत.

COMMENTS