Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंचल चिंतामणीने मिळविले दुसर्‍यांदा सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ; जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

जामखेड ः जामखेड येथील आंचल अमित चिंतामणी हिने राष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा सुवर्णपदक मिळविले आहे .तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी

नगरमध्ये ओमायक्रान संशयित रुग्ण नाही ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका- मनपा आयुक्त
LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना
पत्रकारांचे प्रश्‍न सरकारने तातडीने मार्गी लावावे

जामखेड ः जामखेड येथील आंचल अमित चिंतामणी हिने राष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा सुवर्णपदक मिळविले आहे .तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंचल चिंतामणीच्या कामगिरीमुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंचल हि दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी यांची नात तर नगरसेवक अमित चिंतामणी, प्राजंल चिंतामणी यांची मुलगी आहे. नुकत्याच इंटरनॅशनल फ्लोअरबॉल फेडरेशन (खऋऋ) अंतर्गत असलेल्या तामिळनाडू फ्लोअरबॉल असोसिएशनच्या वतीने कन्याकुमारी येथे राष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धा 2024 पार पडल्या. यामध्ये 19 वर्षे वयोगटात महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत सलग दुसर्‍यांदा करंडक मिळवला आहे.
यामध्ये आंचल अमित चिंतामणी हिची सलग दुसर्‍यांदा उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय फ्लोअर बाँल स्पर्धेत तिला खेळण्याची संधी मिळणार आहे. या यशाबद्दल बद्दल तिच्यावर सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS