नवी दिल्ली ः देशामध्ये थंडीची लाट असून, या लाटेत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. तसेच कोरोनाचा नवीन प्रकारचा संसर्गही वाढतच
नवी दिल्ली ः देशामध्ये थंडीची लाट असून, या लाटेत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. तसेच कोरोनाचा नवीन प्रकारचा संसर्गही वाढतच आहे. 5 डिसेंबपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या घटली होती. त्यानंतर पुन्हा आता ही संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात एका दिवसात कोरोनाच्या रूग्णांमध्ये 305 नवीन रूग्णांची भर पडली आहे. संसर्गाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 2 हजार 439 वर असल्याचे आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील प्रत्येकी एक-तीन मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जेएन-1 उप-प्रकारामुळे नवीन रूग्णांमध्ये वेगाने वाढ होत नाही. हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूदरातही वाढ होत नाही. देशात यापूर्वी कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. 2020 च्या सुरुवातीला कोरोना महामारीची सुरूवात झाली होती. देशभरात आतापर्यंत 4.5 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. त्यानंतर चार वर्षांत 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS