Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिमल निकम यांना कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी पुरस्कार

बळवंत वराळे प्रतिष्ठाणकडून पुरस्काराची घोषणा

अहमदनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील बळवंत वराळे प्रतिष्ठाणकडून आम्ही भारतीय विशेष गौरव पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आली आहे. यानुसार यंदाचा

तिघांवर गुन्हा दाखल, एक सावकार जेरबंद; कर्जत पोलिसांची सावकारांविरुद्धची मोहीम सुरूच
डोक्यात दांडा मारून एकाचा खून
Ahmednagar : संगमनेरमध्ये ६१ लाखांचा माल असलेला मालट्रक पळवला LokNews24

अहमदनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील बळवंत वराळे प्रतिष्ठाणकडून आम्ही भारतीय विशेष गौरव पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आली आहे. यानुसार यंदाचा कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी पुरस्कार अहमदनगर महानगरपालिकेतील जल अभियंता परिमल निकम यांना, तर दंगलकार, सुप्रसिद्ध कवी, लेखक नितीन सुभाष चंदनशिवे, कर्नाटक राज्यातील बिदर येथील सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार सोनाजीराव सूर्यान या तिघांच्या नावांची पुरस्कारासाठी घोषणा घोषणा बळवंतराव वराळे स्मृती प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मालतीताई वराळे यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून स्मृतीशेष म्हणून माजी आमदार बळवंतराव वराळे यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या, उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारांचे वितरण 2 फेबु्रवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे घेण्यात येणार्‍या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत विठ्ठलराव पोस्ते, ज्येष्ठ लेखिका आशालताई कांबळे, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी कुणाल वराळे यांचा युगपुरूष भीम-गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष लहुकांत मधाळे, प्रतिष्ठाणचे सदस्य डी.सी.तरकसे यांनी दिली आहे.  

बळवंतराव वराळे प्रतिष्ठाणचे सामाजिक योगदान – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निकटवर्ती सहकारी म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार कालकथित बळवंतराव वराळे यांच्या नावाने 2016 मध्येे बळवंतराव वराळे स्मृती प्रतिष्ठानची औरंगाबादमध्ये स्थापना करण्यात आली आहे. या प्रतिष्ठाणच्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. दरवर्षी बळवंतराव वराळे यांच्या जयंती निमित्त विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करुन समाजात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या तीन व्यक्तींची निवड करुन या प्रतिष्ठाणकडून पुरस्कार देण्यात येतो. यासोबतच वराळे प्रतिष्ठाणकडून विविध सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत, अनाथ मुलांसाठी मदत, सेजल निराधार महिला आधार केंद्र, सहारा अनाथालय गेवराई, बीड यांना आर्थिक मदत करत आपले सामाजिक योगदान दिले आहे. यासोबतच वृद्धांसाठी, महिलांसाठी कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात येते. संविधानाबद्दल जनजागृती करून, सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी विशेष योगदान देण्यात येते.

COMMENTS