नाशिक - मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील पाटबंधारे उपविभाग सटाणा अंतर्गत असलेले लघु प्रकल्प पठावे, दसाणे, जोखाड यांचे जलाशय व नदी

नाशिक – मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील पाटबंधारे उपविभाग सटाणा अंतर्गत असलेले लघु प्रकल्प पठावे, दसाणे, जोखाड यांचे जलाशय व नदीवरील मंजूर उपसा सिंचन व कालवा प्रवाही तसेच कालव्यावरील मंजुर उपसा सिंचन द्वारे पाणी पुरवठा करणेसाठी शेतकऱ्यांनी 14 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत असे आवाहन कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग म.नं डोके यांनी केले आहे.
रब्बी हंगाम 2023-24 मध्ये पिण्यासाठी आरक्षित पाण्या व्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याचे नियोजन संबंधित कालावा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. संबंधित लघु प्रकल्पांमधील सिंचनासाठी उपलब्ध होणार पाणीसाठा विचारात घेवून रब्बी हंगामात पेरणी झालेली पिके व उभ्या पिकांना हंगामी पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन आहे.
वरील प्रमाणे करण्यात येणारा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र शासन सिंचन कायदा सन 1976 व महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन कायदा 2005 यातील तरतुदी व प्रचलित शासन धोरण तसेच शासनातर्फे वेळोवेळी काढण्यात येणारे शासन निर्णय यांच्या आधीन राहून करण्यात येणार आहे. नमुना नं 7 कोरे पाणी अर्ज शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज संबंधित शाखेत विहित मुदतीत भरून द्यावेत, असेही कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग म.नं डोके यांनी कळविले आहे.
COMMENTS