Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंकडे शिंदे गटाचा युतीचा हात ?

छ. संभाजीनगर ः लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां

निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  
एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो- राज ठाकरे
शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील.

छ. संभाजीनगर ः लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून काही तास होत नाही तोच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी राज ठाकरेंपुढे युतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांची भेट युतीसाठीच झाली होती का, अशा चर्चा आता होतांना दिसून येत आहे. राज ठाकरे आमच्यासोबत आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होऊन महायुतीला लोकसभेच्या 45 हून अधिक जागा मिळतील, असे विश्‍वास शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.
शिरसाठ पुढे बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत 45 हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागावाटपाची चर्चा होईल, तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल, असा माझा अंदाज आहे. संजय शिरसाट म्हणाले की, 10 जानेवारीच्या निकालाची आम्हाला चिंता नाही. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागणार याचा आम्हाला पूर्ण विश्‍वास आहे.एकनाथ शिंदेंचा दौरा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला सभा येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा कार्यकर्ता मेळावा असून जाहीर सभा नाही. आगामी लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येण्यात येणार. या मेळाव्याला जाहीर सभेचे स्वरुप देण्यात येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. आगामी काळातील युतीची नांदी अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागली आहे. बंद दाराआड झालेल्या या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS