Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी ः राजेश परजणे

कोपरगाव शहर ः सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक शेतकर्‍यांनी भविष्याचा विचार करत आपल्या शेतात जाऊन प्रत्यक्ष ई-पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन महानंद

आई जगाचा पोशिंदा तर शेतकरी बाप व दिशा देणारा शिक्षक ः सुनील कडलग
अकोल्यात दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
पारनेर सैनिक बँकेवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कोपरगाव शहर ः सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक शेतकर्‍यांनी भविष्याचा विचार करत आपल्या शेतात जाऊन प्रत्यक्ष ई-पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन महानंदा दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शेतकर्‍यांना केले आहे. ऑनलाइन पीक पहाणीबाबत शेतकर्‍यांना पुरेशी माहिती नसल्याने कोपरगाव  तहसील कार्यालयाच्या वतीने शनिवारी 23 डिसेंबर रोजी चला शेतात जाऊ या, पीक पाहणी करूया या  उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकर्‍यांना अँड्रॉइड मोबाईल फोन द्वारे पिक पाणी 2.0 हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून या हंगामातील रब्बी हंगामातील पिकांची पीक पाहणी करावयाचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना देत आहे.
याच पार्श्‍वभूमीवर अनुषंगाने संवत्सर येथील महानंदा दूध संघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या शेतात अधिकार्‍यांनी प्रत्यक्षात जात ई पीक पाहणी प्रात्यक्षिक दाखवले असता या प्रसंगी स्वतः परजणे यांनी आपल्या शेतातील पिकांची मोबाईल अ‍ॅपद्वारे ई-पिक पाहणी करून घेतली. या प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते, संवत्सर गावचे तलाठी संदीप लहाने, कोतवाल मुन्नाभाई पठाण, संवत्सरकरचे उपसरपंच विवेक परजणे, लक्ष्मण परजणे, सोमनाथ निरगुडे, अमित लोणारी, हर्षल परजणे, विजय परजणे, ऋषिकेश परजणे आदि शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी परजणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, शेतकर्‍यांना ई- पीक पाणी प्रक्रिया सध्या तरी अवघड वाटत असली तरी देखील शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची पीक पाहणी करून घ्यावी कारण भविष्यात शासनाच्या शेतकर्‍यांच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वाच्या योजना असतील त्याचा फायदा नक्कीच याद्वारे शेतकर्‍यांना होऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी आपल्या मोबाईल फोन मध्ये पिक पाहणी 2.0 मोबाईल पचा वापर करत करून घ्यावी असे आवाहन परजणे यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

COMMENTS