Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘सालार’ नी 3 दिवसांतच पार केला 200 कोटींचा टप्पा

मुंबई प्रतिनिधी - 2023 हे वर्ष प्रभाससाठी खूप चांगले ठरले आहे. या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातील एक ‘आदिपुरुष’ फ्लॉप ठरला.

प्रेमसंबंधातून आई वडिलांसमोर अल्पवयीन मुलीचे केले अपहरण
कर्जतच्या तहसीलदारांनी उचलले ठोस पाऊल; लेखी तक्रारी करण्याचे आवाहन
Beed : दुधउत्पादक शेतकऱ्यांना रस्त्या अभावी जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

मुंबई प्रतिनिधी – 2023 हे वर्ष प्रभाससाठी खूप चांगले ठरले आहे. या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातील एक ‘आदिपुरुष’ फ्लॉप ठरला. यानंतर निर्मात्यांपासून ते समीक्षक आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांच्या नजरा प्रभासच्या ‘सालार’कडे लागल्या होत्या. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमाचा बोलबाला सर्वत्र बघायला मिळाले. सालार रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत आणि चित्रपटाने जगभरात तिहेरी शतक ठोकण्यात यश मिळविले आहे. तिसर्‍या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे यश सुरूच आहे, त्यामुळे ‘सालार’ने आतापर्यंत किती कमाई केली आहे, जाणून घ्या…

प्रभासचा ‘सालार’ 22 डिसेंबर रोजी तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी 178.7 कोटी रुपयांचा परदेशात व्यवसाय केला, यासह तो 2023 मधील सर्वात मोठा भारतीय सलामीवीर ठरला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही चित्रपटाने मोठी कमाई केली. दुसऱ्या दिवशी त्याचे जगभरातील कलेक्शन 295.7 कोटी होते. यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रभासच्या अॅक्शनपटानेही 300 कोटींचा आकडा पार केला. आता ताज्या आकडेवारीनुसार 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘सालार’ने रविवारी जगभरात 325 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी, चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी, चित्रपटाला ख्रिसमसच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा मिळेल, त्यानंतर अवघ्या चार दिवसांत तो 400 कोटींचा टप्पा ओलांडू शकेल, असे बोलले जात आहे.

COMMENTS