Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टीका करणाऱ्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देईल:- खा.सुजय विखे

पाथर्डी प्रतिनिधी - करोडी ते टाकळी मानूर या रस्त्याच्या कामाला मंजुरी आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नामुळे मिळाली असून त्यांच्यावर टीका करणा

रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | DAINIK LOKMNTHAN
विद्यार्थ्यांचे यश हेच गावाचे यश – शिवाजी कराड
येवला नाका भागातील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण

पाथर्डी प्रतिनिधी – करोडी ते टाकळी मानूर या रस्त्याच्या कामाला मंजुरी आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नामुळे मिळाली असून त्यांच्यावर टीका करणाऱ्याला जनता येत्या निवडणुकीत योग्य उत्तर देईल अशा शब्दात खासदार डॉ सुजय विखे यांनी राजळे यांच्यावर मध्यंतरी झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

ते शनिवारी टाकळी मानूर येथे करोडी ते टाकळी मानूर या  रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी विखे बोलत होते.यावेळी आमदार मोनिका राजळे,अभय आव्हाड,माणिक खेडकर,धनंजय बडे संजय बडे,शुभम गाडे,प्रशांत मंडलेचा,कुंडलिक आव्हाड,पांडुरंग लाड,अंकुश चितळे,महेश बोरुडे,बबन सबलस,अंकुश कासुळे,नाना खेडकर,बाबासाहेब ढाकणे,उमेश खेडकर,सचिन वायकर,रवी आरोळे,विजय जोशी,सतीश शिरसाठ,विजय किसवे हे उपस्थित होते.दिवसभरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन तालुक्यातील टाकळीमानुर ते करोडी ८ कोटी रुपये व वडगाव ढाकणवाडी चिंचपुर पांगुळ सुमारे ५ कोटी रूपये अशा एकुण १३ कोटी रुपये रस्ता कामाचा शुभारंभ व विविध कामांचा लोकार्पण सोहळा खा.विखे व आ. राजळे यांचे हस्ते करण्यात आला

          या वेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले कि या रस्त्याच्या कामाचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला असून सध्या मुख्यमंत्री आमच्या सोबत आहे तर या कामाला मंजुरी पालकमंत्री विखे यांनी दिली असून ते माझे वडील आहेत.या कामाचा पाठपुरावा राजळे यांनी व मी केला असल्याने या रस्त्याला मंजुरी आम्ही दिली मग या कामाचे श्रेय विरोधकांचे कसे? या रस्त्याच्या कामावरून आंदोलने करणे म्हणजे धूळफेक आहे.राजळे यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात शंभर कोट रुपयांचा निधी मतदारसंघात आणला आहे.काही माणसे वाढसदिवस,अंत्यविधीला उपस्थित राहतात मात्र गावच्या विकासाला एक रुपयाचाही निधी आणत नाहीत.

      यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की, या रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर कुदळ हातात घेऊन रस्ता खोदु असा इशारा विरोधकांनी दिला मात्र त्यांच्यावर ही वेळ आम्ही येऊ दिली नाही.या रस्त्याच्या कामावरून खूप राजकारण करण्यात आले.मात्र त्यांची सत्ता असताना त्यांना रास्ता देखील मंजूर करता आला नाही हा.चार महिन्यापूर्वी या रस्त्याची मंजुरी मिळून तांत्रिक गोष्टीमुळे हे काम सुरू व्हायला विलंब झाला. हा रस्ता चांगला आणि दर्जेदार होऊन लवकर व्हावा अशी भावना होती. जनतेच्या मागणीमुळे हा रस्ता आपण करत आहोत.पंकजाताई मुंडे या मंत्री असताना या मतदारसंघात विशेष लक्ष देऊन त्यांनी विकासाचा निधी दिला.येत्या निवडणुकीत या भागातील जनता डॉ.विखे यांना मोठे मताधिक्य देणार असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले की,महिला आमदार असतानाही त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्याचे काम सध्या सुरू आहे.येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजळे व विखे यांना निवडून द्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जोशी सूत्रसंचालन राजू सुरवसे तर आभार शुभम गाडे यांनी मानले.

COMMENTS