Homeताज्या बातम्यादेश

सरकारकडून नवीन वर्षाची भेट, LPG सिलिंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली प्रतिनिधी - सरकारी तेल विपणन कंपन्यांनी देशातील चार महानगरांमध्ये सुमारे १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती ३९.

खातेवाटपांसह मंत्रिमंडळ विस्तार रखडला
पंचकुलात सापडला बॉम्बचा शेल  
राज ठाकरे त्यांच्या आजोबांच्या विचारांच्या पुर्ण विरोधात जाऊन काम करतात

नवी दिल्ली प्रतिनिधी – सरकारी तेल विपणन कंपन्यांनी देशातील चार महानगरांमध्ये सुमारे १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती ३९.५ रुपयांनी कमी केल्या आहेत. किमतीतील कपात आजपासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून लागू होणार आहे. या सुधारणांमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमती सध्याच्या पातळीवर ठेवल्या आहेत. यापूर्वी १६ नोव्हेंबरला व्यावसायिक एलपीजीच्या किमती ५७ रुपयांनी कमी झाल्या होत्या. मात्र त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमध्ये मतदान पूर्ण होताच पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्यात आले होते. १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती २१ रुपयांनी वाढवल्याचे वृत्त होते तर आता २१ दिवसांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. २२ डिसेंबरपासून लागू होणार्‍या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमती कोलकातामध्ये व्यावसायिक LPG सिलिंडरची आजची किंमत- १,८६८ रुपये मुंबईत आज व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत- १,७१० रुपये चेन्नईमध्ये आज व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत- १,९२९ रुपये दरम्यान, यापूर्वी ऑक्टोबरमध्ये, ओएमसीने व्यावसायिक एलपीजीच्या किमती २०९ रुपयांनी वाढवल्या होत्या, आणि त्याआधी सप्टेंबरमध्ये १५८ रुपयांची कपात केली होती.

COMMENTS