कोपरगाव तालुका ः तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून व बिपीनदादा कोल्ह
कोपरगाव तालुका ः तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून व बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी साईनाथ पंढरीनाथ तिपायले तर उपाध्यक्षपदी केशव गोविंद बटवाल यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव कार्यालयाचे के. आर. वाळके होते. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदासाठी साईनाथ तिपायले यांच्या नावाची सूचना संचालक विलास कहांडळ यांनी केली तर त्यास संचालक उत्तम शेळके यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी केशव बटवाल यांच्या नावाची सूचना संचालक आण्णासाहेब पगारे यांनी केली तर त्यास संचालक सुदाम उगलमुगले यांनी अनुमोदन दिले. माजी अध्यक्ष देवराम देवकर व उपाध्यक्ष सुदाम उगलमुगले यांचाही यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ तिपायले व उपाध्यक्ष केशव बटवाल म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली काम करून सभासद, कामगारांच्या अडी अडचणी सोडविण्यांस प्राधान्य देउ. या निवडीबददल माजी आमदार स्नेहलता कोल्हे, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, कामगार नेते मनोहर शिंदे, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे आदिंनी अभिनंदन केले. ही निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी स्विय्य सहाय्यक रंगनाथ लोंढे, पतपेढीचे संचालक सर्वश्री. सुरेश मगर, सुभाष होन यांनी विशेष सहकार्य केले. कार्यकमाचे सुत्रसंचलन व आभार व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी केले
COMMENTS