Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीत भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

परभणी ः परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी पाटीवर उसाने भरलेला ट्रक आणि देवदर्शनाहून परतणार्‍या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांचा ज

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू
BMW कारची 4 जणांना धडक

परभणी ः परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी पाटीवर उसाने भरलेला ट्रक आणि देवदर्शनाहून परतणार्‍या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, परतूर तालुक्यातील ब्राह्मण वाडीमधील 9 जण परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील मारुती दर्शनाला गेले होते. यावेळी दर्शन करुन घराकडे येताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ त्यांच्या क्रूझरचा आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS