Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थंडीचा कडाका वाढताच अंडी महागली

मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तापमानातील सततच्या चढउतारांमुळे थंडीचा क

अभिनेत्री सना खान बनली आई, दिला मुलाला जन्म
BREAKING: कोरोना होऊन गेला तरी लोकांना कळत नाही नांदेडच्या छातिरोगतज्ज्ञांचा खुलासा | LokNews24
‘एक्स’कडून एका महिन्यात 1.85 भारतीयांचे खाते बंद

मुंबई प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तापमानातील सततच्या चढउतारांमुळे थंडीचा कडाका जाणवत नसला तरी वातावरणात गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अंड्याचे दर वाढले आहेत. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात ख्रिसमस, नववर्षाचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रमाण जास्त असते. यंदाही हा ट्रेंड कायम असल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे. घरगुती वापर, बेकरी आणि हॉटेल्सकडून अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत एक डझन अंड्यांचा दर ९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.गेल्या आठवड्यात एक डझन अंड्यांचा दर ८० ते ८४ रुपये इतका होता. मात्र, मागणी वाढल्याने सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला डझनभर अंड्यांचा दर थेट ६ ते १० रुपयांनी वाढून ९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये तर डझनभर अंड्यांसाठी ग्राहकांना ९४ रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात अंड्यांचा दर डझनमागे ९० रुपये इतका नोंदवला गेला होता. नॅशनल एग कमिटीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अंड्यांच्या खरेदीचा डझनासाठीचा घाऊक दर हा ७८ रुपये इतका आहे. मात्र, दुकानदार सर्व खर्च धरुन एका अंडं ६ ते १० रुपयांदरम्यान विकतात. मंगळवारी १०० अंड्यांचा दर ६२० रुपयांवर जाऊन पोहोचला. नोव्हेंबर महिन्यात १०० अंड्यांचा दर ५८०, ऑक्टोबर महिन्यात ५६० आणि ऑगस्ट महिन्यात ४८० रुपये इतका होता. तर सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून एक डझन अंड्यांसाठी ८४ ते ९० रुपये इतका दर आकारला जात आहे.

COMMENTS